जळगावात बसचालक, हॉकर्समध्ये वाद; शहर पोलीसात तक्रार

complain

जळगाव । फुले मार्केट परिसरातून असोदा रेल्वेगेटकडे जात असलेल्या एसटी बसला रस्त्यावरील अतिक्रमणामुळे अडचण निर्माण होते. यामुळे बुधवारी दुपारी १२ वाजता एसटी बसचालक व एका हॉकर्समध्ये वाद झाले. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

या प्रकारामुळे हॉकर्स अजय राधेश्याम माधवे रा. गुरूनानक नगर, शनिपेठ जळगाव व बसचालक प्रविण प्रकाश सोनवणे रा. जैनाबाद नाल्याजवळ यांची एकमेकांच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी शहर पोलिस ठाण्यात पोहोचले होते. यामुळे पोलिस ठाण्यात प्रचंड गर्दी झाली होती. अखेर हा वाद अपसात मिटवण्यात आला.

Protected Content