खान्देश सेंट्रलच्या पार्कींगमध्ये तरुणीची छेड; टवाळखोरांविरोधात पोलिसात तक्रार

complain

जळगाव प्रतिनिधी । खान्देश सेंट्रलच्या पार्कींगमध्ये काही टवाळखोरांनी तरुणीची छेड काढल्याचा प्रकार १२ नोव्हंेबर रोजी घडला होता. या प्रकरणी तरुणीने बुधवारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सविस्तर असे की, ही तरुणी खान्देश सेंट्रल येथे चित्रपट पाहण्यासाठी आली होती. ती दुचाकी पार्कींगमध्ये उभी करीत असताना तेथे झाडाखाली उभ्या असलेल्या तीन-चार टवाळखोरांनी तीला दुचाकी उभी करण्यास मज्जाव केला. तरुणीने दुर्लक्ष केल्यांनतर टवाळखोरांनी मोठ-मोठ्याने हसुन तीची खील्ली उडवली. ऐवढ्यावरच न थांबता या टवाळखोरांनी तीच्या दुचाकीच्या चाकातील हवा देखील काढुन ठेवली होती. चित्रपट संपल्यानंतर तरुणी दुचाकीजवळ आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तो पर्यंत टवाळखोर पसार झाले होते. या तरुणींने शहर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.

Protected Content