भुसावळातील शिवाजीनगरचे नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर करावे !

bhusawal nivedan

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील शिवाजीनगर या भागाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज नगर असे करण्याची मागणी लोकाधिकार जनजागरण मंचचे अ‍ॅड. अभिजीत मेने यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत वृत्त असे की, जागतिक लोकाधिकार मंच या संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. अभिजीत मेने यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना नुकतेच निवेदन सादर केले. यात म्हटले आहे की, भुसावळ शहरात शिवाजीनगर हा गजबजलेल्या लोकवस्तीचा मोठा परिसर असून आम्ही स्वत: या भागातील रहिवासी आहोत. या भागाचे नाव हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करणारे आहे. यामुळे शिवरायांचा अवमान होत आहे. ही बाब लक्षात घेऊन नगरपालिका प्रशासनाने याचे नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर असे करावे. जेणेकरून शिवरायांचा सन्मान राखला जाईल. असे न झाल्यास संघटनेतर्फे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा या पत्रकातून देण्यात आला आहे. याप्रसंगी लोकाधिकार जनजागरण मंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अभिजीत मेने यांच्यासह त्यांचे सहकारी उपस्थित होते. मुख्याधिकार्‍यांच्या वतीने त्यांच्या सहकार्‍यांनी हे निवेदन स्वीकारले.

Protected Content