जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव आणि भुसावळ तालुक्यातील विविध भागातून दुचाकींची चोरी करणाऱ्या तीन संशयित आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या १० दुचाकी जप्त केले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल विनोद पाटील यांना मिळालेल्या गोपनिय माहिती नुसार जामनेर तालुक्यातील टाकरखेडा गावातील संशयित आरोपी विशाल गोपाल भोई हा चोरीची दुचाकी घेवून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना दिली. त्यानुसार पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, दत्तात्रय पोटे, पोहेकॉ गजानन देशमुख, विनोद पाटील, महेश महाजन, विष्णू बिऱ्हाडे, ईश्वर पाटील, रणजीत जाधव, राहूल महाजन यांनी शनिवारी २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता कारवाई करत संशयित आरोपी विशाल भोई याला अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्याने ही चोरी देवानंद उर्फ आनंद भोजरंग सुरडकर आणि सुरज अशोक पारधी दोन्ही रा. टाकरखेडा ता. जामनेर यांच्या सोबत केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या एकुण १० दुचाकी जप्त केले आहे.