सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सावदा शहरात प्रथमच ऑल इंडिया कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या प्रसंगी आज २१ सप्टेंबर रोजी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नियोजित कार्यक्रमात काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून सावदा नगराध्यक्ष राजेश वानखेडे तसेच फैजपूरचे माजी उपनगराध्यक्ष कुर्बान मेम्बर यांना उद्घाटनासाठी पाठविले त्याच बरोबर सावदा पोलीस उप निरीक्षक विशाल पाटील हे ही उपस्थित होते.
जोजोभाई फ्रेंड सर्कल तथा नॅशनल कॅरम क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे देशभरातून विविध राज्यातून खेळाडू प्रतिस्पर्धी म्हणून आलेले आहेत स्पर्धेचं स्वरूप मोठे असून सलग तीन दिवस स्पर्धा सुरू राहील. २३ सप्टेंबर या दिवशी स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजेत्या स्पर्धकाला आमदार चषक व रोख बक्षिसे देण्यात येतील. स्पर्धेसाठी जैन इरिगेशन समूहाची मदत झाली व जैन इरिगेशन चे सिनियर खेळाडू मोसीन भाई यांनी परिश्रम घेतले स्पर्धेसाठी विविध राज्यातून जवळजवळ 150 खेळाडू यांनी सहभाग नोंदविला आहे अशाच स्पर्धा भविष्यात सावदा शहरात खेळविण्यात येतील