यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील मनवेल येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेचा रौप्य महोत्सव नुकताच साजरा करण्यात आला. मनवेल आश्रमशाळा स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यावल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी भूषविले.
यावेळी कार्यक्रमासाठी व्यासपीठावर प्रमुख पाहूणे म्हणून मनवेल ग्रामपंचायतीचे सरपंच जयसिंग सोनवणे, उपसरपंच मिनाबाई पाटील, ग्रामपंचायत सदस्य नरहर भिल, पोलीस पाटील प्रियंका पाटील, डॉ. सुरेश पाटील, वर्डी हायस्कूलचे चेअरमन हरीशचंद्र चव्हाण, शिक्षक अमित पाटील, मनवेल ग्रामस्थ गोविंद पाटील, मनवेल आश्रमशाळा संस्थेचे अध्यक्ष हुकूमचंद पाटील, उपाध्यक्ष बी.एल. देशमुख, सचिव मीराताई पाटील, सहसचिव यादवराव पाटील, खजिनदार अॅडव्होकेट ललित पाटील, सभासद देवीदास पाटील, मंगलराव पाटील, प्राथमिक मुख्याध्यापक संजय अलोणे, माध्यमिक मुख्याध्यापक सचिन पाटील, अधीक्षक वसंत पाटील उपस्थित होते.
प्रास्ताविकात शिक्षक राकेश महाजन यांनी शाळेची यशोगाथा सांगितली. प्रतिमापूजन व विद्यार्थीनींच्या स्वागत गीतानंतर उपस्थित मान्यवरांचा यथोचित स्वागत सत्कार करण्यात आला. शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आंतरशालेय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘महापुरुषांच्या अश्रूधारा’ हे नाटक सादर केले. संस्थेचे अध्यक्ष हुकुमचंद पाटील यांनी संस्थेच्या उभारणीत मोलाची कामगिरी बजावल्याने आज ही टोलेजंग इमारत उभी असून त्यामध्ये आदिवासी मुले शिक्षण घेत आहे व आश्रम शाळेतून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी हे वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीस रुजू झालेले आहेत ही आश्रम शाळेसाठी अभिमानाची बाब आहे असे उद्गगार संस्थेचे अध्यक्ष हुकुम पाटील यांनी काढले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राथमिक मुख्याध्यापक संजय अलोणे, माध्यमिक मुख्याध्यापक सचिन पाटील, अधीक्षक वसंत पाटील, अधिक्षिका सरीता तडवी, ज्येष्ठ शिक्षिका उज्ज्वला पाटील, शिक्षक सुभाष पाटील, राकेश महाजन, नितीन चौधरी, कैलास बेलदार यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.