यावल येथे खा. सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळवाटप कार्यक्रम

यावल प्रतिनिधी । अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा खा.सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त यावल तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने हिंगोणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि यावल येथील ग्रामीण रूग्णालयात गर्भवती महिलांना फळवाटपाचा कार्यक्रम घेण्यात आले.

प्रभाकर आप्पा सोनवणे व भगतसिंग पाटील यांच्या प्रमुख उपस्थितात व हस्ते फळे वाटप करण्यात आली. 

याप्रसंगी हिंगोणा प्राथमिक आरोग्य केन्द्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. फिरोज तडवी, महेश राणे सरपंच हिंगोणा, जावेद जनाब, काँग्रेस कमेटीचे यावल शहराध्यक्ष कदीर खान, एस.पी.बोदडेनाना, समाधान पाटील (माजी सरपंच नावरे) चंद्रकला इंगळे (उपाध्यक्ष अनु जाती) काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफफार शाह, शहरउपाध्यक्ष अनिल जंजाळे, यावलचे नगरसेवक शेख अस्लम शेख नबी, युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ईमरान पहेलव, नगरसेवक समिर मोमीन, सैय्यद ईखलास यावल तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक आघाडीचे रहेमान भाई, नईम शेख शहर सरचिटणीस, युवक कॉग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राहुल बारी, उस्मान तडवी, प्रशांत मोरे, फारूकी ईसरारोधीन, शेख सकलेन अभिषेक इंगळे, आदी कार्यकर्ते उपस्थित यांच्यासह आदी कॉंग्रेस कमेटीचे पदाधिकारी कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते.

 

Protected Content