यावल तालुक्यात महावितरणचा भोंगळ कारभार : रिडिंग न घेताच ग्राहकांना दिली बिले

यावल लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील विजपुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीच्या यावल विभागात वीज मीटरचे रीडिंग न घेताच बिल दिले जात असून या भोंगळ कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी वीज ग्राहकांनी केली आहे.

 

या संदर्भातील वृत्त असे की, यावल शहरासह तालुक्यात लाखो नागरीकांनी घरगुती वापरासाठी व शेतकरी यांनी शेतीसाठी महावितरण या विद्युत पुरवठा करणाऱ्या कंपनीकडुन विजजोडणी घेतली आहे . मात्र, मागील कोरोना काळातील एक ते दीड वर्षापासून सर्वसामान्य नागरीक हा आधीच आर्थिक संकटात ओढला गेला आहे. कोरोनाचा काळ संपत असतांना महावितरणकडुन २o२१ ते २०२२च्या मार्च अखेर व मागील रिडींग वाचन झालेले नसतांना ठेकेदाराकडून रिडींगची चौकशी व खातरजमा न करता अंदाजीत बिलांची वसुलीच्या नांवाखाली वाढीव अव्वा की सव्वा विद्युत बिल आकारणीसाठी पाठविण्यात येत आहे. या बोगस व अंदाजीत बिलांच्या वसुलीसाठी ऐन उन्हाळ्यात अनेक ग्राहकांना पूर्व सुचना किंवा त्यांचे म्हणणे न ऐकता विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा संतापजनक प्रकार घडत आहेत. अशा प्रकारांमुळे ग्राहकांमध्ये तिव्र स्वरूपाची नाराजी पहावयास मिळत आहे.

Protected Content