प्रजापिता ब्रह्माबाबांची शिकवण विश्‍व शांतीसाठी आवश्यक

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज प्रजापिता ब्रह्मा बाबा यांचा स्मृती दिन. यानिमित्त त्यांच्या महान जीवन कार्याला दिलेला हा उजाळा !

जगात विविध देशांमध्ये सध्या होत असलेली साम्राज्यविस्तार स्पर्धा किंवा आणखी काही देशांमधील सातत्याने होत असलेली कुरघोडी, क्षेपणास्त्रां वरील होत असलेला वाढता खर्च आणि हिंसाचाराचे बदलते स्वरुप पाहता जागतिक पातळीवरील शांती करीता कोण पुढाकार घेणार हा यक्षप्रश्न आहे. या सर्वांचे मुळ आहे मानव समाजाच्या वाढत असलेल्या लोभ, लालच, क्रोध, अहंकार आदी दुगुर्णात जागतिक शांतता हा काही बाह्य घटक नाही तर जगातील प्रत्येक मानव मात्रांच्या ठायी असलेली शांती आहे. ब्रह्माकुमारी विश्व विद्यालयातर्फे विश्व शांतीसाठी सातत्याने प्रयत्न करणाङया लाखो साधकांचे प्रेरणास्थान प्रजापिता ब्रह्मा यांची शिकवण याप्रसंगी फार मोठे कार्य करीत आहे.

शांती स्थापन करावयाची असल्यास प्रथमत: स्वत: पासून करावी यासाठी त्यांनी ओमशांती हा महामंत्र जगास दिला. त्यांच्या जीवनात अशा बङयाच घटना आल्यात परंतु स्थाई मन शांती त्यांनी ढळू दिली नाही. त्यामुळे याचा प्रभाव लाखो साधकांवर झाला. पुरुष प्रमुख संस्कृतीत कुटुंबातील कर्ती स्त्रीला प्रमुख अधिकार देण्याच्या बाबतीत पुढाकार घेण्याचे काम ब्रह्माबाबांनी केले व बहिणीं-मातांच्या हातील जगातील विशाल आध्यात्मिक संस्थेचे नेतृत्त दिले. आज भारतातील आणि जगातील बहुंताश देशातील हजारो खेड्यापाडयातील राजयोग पाठशाळा ते महानगरातील मुख्य सेवाकेंद्र, क्षेत्रीय सेवा केंद्र आणि मुख्यालय माऊंट आबू येथील सेवाकेंद्रांच्या प्रमुख ब्रह्माकुमारी बहिणी आहेत. आजच्या काळात हा फार मोठा आदर्श ब्रह्माबाबांनी मानव समाजाला दिला आहे. त्यांच्यातील असे बरेच गुण विश्वशांतीच्या कार्यात प्रेरणास्थान बनले आहेत. त्यांच्या स्मृतिदिवशी याचे स्मरण प्रकर्षाने होते जेव्हा या आदर्शांवर चालण्याची गजर प्रकर्षाने निर्माण झालेली आहे.

: ब्रह्मकुमारी मिनाक्षी दिदी

Protected Content