अयोध्या प्राणप्रतिष्ठेत उपस्थित महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थ महाराज यांचे स्वागत

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अयोध्या येथे राम मंदिर उद्घाटन समारोहाला उपस्थित महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थ महाराज यांचे अमळनेरात तसेच कळमसरे व निम गावी आणि रस्त्याने ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला अमळनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलेश्वर येथून हंसानंद महाराज अयोध्या येथे गेले होते. जळगाव जिल्ह्यातून स्वामी हंसानंद तीर्थजी महाराज अखिल भारतीय संत समितीच्या निर्देशक मंडळाचे सदस्य आहेत.

महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थ जी महाराज यांचे श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर संस्थान विकासासाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे.त्यांचे गोरखपुर बांद्रा एक्सप्रेसने अमळनेर रेल्वे स्टेशनवर आगमन झाले, त्यावेळी अमळनेर रेल्वेस्टेशनवर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी श्री कपलेश्वर मंदिर संस्थांचे उपाध्यक्ष सी.एस.पाटील, स्वामी देवेश्वर तीर्थ महाराज, सचिव मगन पाटील, ज्येष्ठ विश्वस्त घनश्याम अग्रवाल तसेच कळमसरे व निमगाव येथे देखील बसस्थानक आवारात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत औक्षण व यथोचित सत्कार करून स्वागत करण्यात आले. अमळनेर मधील असंख्य भाविकांनी महाराजाचं स्वागत केले. त्यावेळी रेल्वे प्रशासनाने खूप सहकार्य केले. संपूर्ण अमळनेर रेल्वे स्टेशनवर जय श्रीरामचा जयघोष येत होता.

Protected Content