वरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘पैलवान ग्रुप’च्या भुसावळ तालुकाध्यक्षपदी श्रीराम एकनाथ यांची निवड झाली असून उपाध्यक्षपदी अक्षय सुनील माळी यांची निवड झाली आहे.
शनिवार, दि.५ फेब्रुवारी रोजी ‘पैलवान ग्रुप’ची सभा धुळे येथे संपन्न झाली. अध्यक्षस्थानी पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पैलवान मारोती जाधव हे होते. जळगांव जिल्हातील भुसावळ तालुका अध्यक्षपदी पैलवान श्रीराम एकनाथ भोई यांना आणि भुसावळ तालुका उपाध्यक्षपदी पैलवान अक्षय सुनिल माळी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे
पैलवान ग्रुप महाराष्ट्र अध्यक्ष मारोती जाधव आणि पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य महिला संपर्कप्रमुख कविता कोळी यांच्या हस्ते पैलवान श्रीराम एकनाथ भोई यांचा पुष्पहार आणि पैलवान ग्रुपचे नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. या यश निवडीबद्दल माणगाव येथील हनुमान व्यायाम शाळेच्या वतीने वरणगाव येथील मल्ल यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .