पारोळा शहरात पाच दिवस ‘जनता कर्फ्यू’चे नियोजन

पारोळा प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पारोळा तालुक्यात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तहसील कार्यालयात आमदार चिमणराव पाटील यांच्या उपस्थिती बैठक घेण्यात आली. या बैठकीत पारोळा तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत असल्याने त्याबाबत उपाय योजनांची चर्चा करण्यात आली.

आमदार चिमणराव पाटील यांच्याशी प्रातांधिकारी यांच्याशी प्रांताधिकारी यांच्याशी संपर्क साधून पारोळा शहरात पाच दिवस जनता कर्फ्यूचे नियोजन करण्याबाबत चर्चा करण्याच्या सुचाना देण्यात आल्या आहेते. आज झालेल्या बैठकीत हजर असलेल्या व्यापारी व अधिकारी यांनी साकारात्मक चर्चा करून १२ जून ते १६ जून दरम्यान जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक, वैद्यकिय अधिकारी, कृषी अधिकारी यांच्यासह आर.बी.पाटील, अशोकभाऊ मराठे, पी.जी.पाटील, अशोक चौधरी, मधुकर पाटील, बि.एन.पाटील, राजु कासार तसेच अधिकारी, पत्रकार व शहरातील व्यापारी उपस्थित होते.

Protected Content