स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चोपडा समाजकार्य महाविद्यालयात भारत मातेचे पूजन

चोपडा – लाईव्ह ट्रेंड्स  न्यूज प्रतिनिधी | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त  एनमुक्ता संघटना भगिनी मंडळ चोपडा संचलित, समाजकार्य महाविद्यालय, चोपडा शाखेत भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 

एनमुक्ता संघटना भगिनी मंडळ चोपडा संचलित, समाजकार्य महाविद्यालय, चोपडा शाखेमार्फत प्रा.मा.डॉ.मोहिनी उपासनी व ग्रंथपाल मा.प्रा.कल्पना सोनवणे यांच्या हस्ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज शुक्रवार दि. १२ ऑगस्ट रोजी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  प्रा.कल्पना सोनवणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती निर्माण होण्यासाठी प्राध्यापक डॉ.विष्णू गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांचे उद्बोधन केले.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.  याप्रसंगी एनमुक्ता संघटना चोपडा शाखेचे अध्यक्ष व समाजकार्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.आशिष गुजराथी, सदस्य डॉ.विनोद रायपुरे, डॉ. अनंत देशमुख व सर्व प्राध्यापकवृंद, औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य उदय ब्रम्हे व समाजकार्य महाविद्यालयातील माजी विद्यार्थी जितेंद्र सोनवणे उपस्थित होते.प्रा.नारसिंग वळवी यांनी आभार मानले.

Protected Content