महत्वाची बातमी : तीन महिन्यात आटोपणार सर्व निवडणुका !

नागपुर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत संभ्रमाचे वातावरण असतांना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे.

येत्या तीन महिन्यात राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील असे वक्तव्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. एबीपी-माझा या वृत्तवाहिनीशी बोलतांना त्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केले. याप्रसंगी ते म्हणाले की, पालीका, महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणासहीत करण्याचा आमचा संकल्प असून तीन महिन्यात सर्व निवडणुका पार पडणार आहेत.

याप्रसंगी सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच ओबीसी आरक्षणाचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळाच्या आता पर्यंतच्या सर्व बैठकात आम्ही भरभरून निर्णय घेतले. आधीच्या सरकारच्या सुरुवातीच्या बैठकीत कोणतेही निर्णय झाले नव्हते. शेतकर्‍यांना कर्जमाफीची अनेक वेळेला घोषणा केली मात्र पूर्तता केली नाही, असा आरोपही मुनगंटीवारांनी केला.

Protected Content