सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्याच्या पाठीशी समाज राहतो – पो.नि. इंगळे

jamner news

जामनेर प्रतिनिधी । आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील महिलांसाठी सुरु होत असलेले मोफत शिक्षणाचे ज्ञान वर्ग केंद्र व शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र हा विधायक उपक्रम असून, जो सर्वांना सोबत घेऊन चालतो. त्याच्या पाठीशी समाज नेहमी उभा राहतो, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी
केले.

हाजी सैय्यद करीम वेलफेअर एजुकेशन सोसायटी यांच्यातर्फे अल्पसंख्याक समाजातील गरीब, गरजू महिलांसाठी मोफत शिक्षण ज्ञान वर्ग व शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले त्यावेळी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थांनी नगराध्यक्षा साधना महाजन होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी मंचावर उपनगराध्यक्ष अनिस शेख, बांधकाम सभापती संध्या पाटील, शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, सैय्यद मुश्ताक अली, नाज़िम शेख, रिजवान शेख, नुरू शेख, खलील खान, डॉ. इम्तियाज खान, हारून चौधरी, युनुस कपासी वाले, शरीफ मंसूरी,बबलु खान, आसिफ शेख, शराफत अली, शोएब सौदागर, अजीमोद्दीन शेख, व संस्थेचे वसीम सैय्यद, आसिफ खान, जुबेर अली, मुजाहिद सैय्यद, जमिल खान, शेर अली, मज़हर अली, फिरोज सैय्यद आदी उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्षा साधना महाजन व मान्यवरांचे हस्ते मोफ्त महिलांसाठी शिक्षणाचे वर्ग व शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र चे उदघाटन करण्यात आले. यात आज १५० महिलांची नोंदणी झाली. कार्यक्रम चे प्रस्ताविक सैय्यद लियाकत यांनी केले तर सूत्रसंचलन मजहर अली व आभार आसिफ खान यांनी मानले.

Protected Content