Home क्रीडा नाणेफेक जिंकून श्रीलंकेची पहिल्यांदा फलंदाजी

नाणेफेक जिंकून श्रीलंकेची पहिल्यांदा फलंदाजी

0
51
cricket wc


cricket wc

लीडस वृत्तसंस्था । विश्‍वचषक स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात आज भारताविरूध्द श्रीलंकेने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

आज लीडस येथील मैदानावर भारतीय संघ आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात श्रीलंकेविरूध्द सामना खेळत आहे. भारताने आधीच उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केल्या असल्यामुळे आजच्या सामन्यातील जय वा पराजयाचा फार मोठा फरक पडणार नाही. तथापि, सेमी फायनलमध्ये आपण नेमके कुणाविरूध्द खेळणार यासाठी आजच्या सामन्याचा निकाल निर्णायक ठरणार आहे. हा सामना जिंकल्यास आपला सामना न्यूझीलंडशी होईल. तर पराभव झाल्यास इंग्लंडसोबत खेळावे लागेल.


Protected Content

Play sound