पॅरीस-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत भारतीय नेमबाज चमकले आहेत. शुक्रवारी भारताला नेमबाजीतून तीन पदके मिळाली. आता चौथे पदक भारताच्या रुबिना फ्रान्सिस हिने मिळवून दिले. तिने शनिवार ३१ ऑगस्ट रोजी महिला १० मीटर एअर पिस्तुल एसएच१ प्रकारात कांस्य पदक मिळवून दिले.
अंतिम फेरीत रुबिनाने सुरुवात चांगली केली होती. त्यानंतर मधल्या वेळेत ती थोडी मागे पडली. परंतु, नंतर तिने पुनरागमन करत पुन्हा पहिल्या तीन जणींमध्ये स्थान मिळवले. तीन नंतर तिस-या क्रमांकावर राहिली आणि तिने कांस्य पदक निश्चित केले. तिने २११.१ पाँइंट्स मिळवले. या प्रकारात इराणची सारा जवानमर्दीने २३६.८ पाँइंट्ससह सुवर्णपदक जिंकले, तर तुर्कीची इसेल ओझगनने २३१.१ पाँइंट्ससह रौप्य पदक जिंकले.