याकूबच्या डोक्याला गोळी मारून जीवेठार मारण्याचा प्रयत्न

khandani crime

भुसावळ प्रतिनिधी । शहरात रेल्वे कर्मचार्‍यावर गोळीबार झाल्याची घटना मंगळवारी रात्री उघड झाली होती या कर्मचार्‍याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला की वैमनस्यातून त्याच्यावर गोळीबार झाला, याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. याकूब डॅनियल जॉर्ज (वय-३७) असे जखमी कर्मचार्‍याचे नाव आहे. रेल्वेच्या दहा बंगला भागातील रहिवासी तथा रेल्वेत कर्मचारी असलेले याकूब जॉर्ज हे सोमवारी रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याने त्यांना मंगळवारी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलवल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली तर प्रसंगी त्यांच्यात डोक्यात पिस्तूलची गोळी निघाल्याने वैद्यकीय सूत्रांनी पोलिसांना माहिती दिली.

शहर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी डीवायएसपी गजानन राठोड यांनी माहिती कळताच शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे,सपोनि.दिपक गंधाले, पोउनि.एन.एस.सूर्यवंशी,डी.बी.हवालदार सैय्यद, साजित तडवी, संजय पाटील, सुनील सैदाणे, संजय बडगुजर, मोहन पाटील,सोपान पाटील,विशाल मोहें अशांनी मंगळवारी रात्री १०:१५ वाजता जॉर्ज यांच्या निवासस्थानी तपास कामी गेले असता पोलिसांना घर झडतीत बंदुकीच्या गोळीची रीकामी पुंगळी सापडली आहे.नेमकी बंदूकीतून गोळी जार्जने तर झाडली नसावी ? बंदूक गेली कुठे ? जार्ज वर कोणी हल्ला तर केला नसावा? असे अनेक प्रश्न झालेल्या गोळीबारमुळे समोर येत आहे.

घटनेचे कारण नेमके गुलदस्त्यात !
दरम्यान, जखमी जॉर्ज हे त्यांच्या पत्नीपासून गेल्या चार वर्षापासून विभक्त राहत असून पत्नी पुण्यात वास्तव्यास आहे. गोळीबारानंतर घरात जॉर्ज हे एकटेच घरात पडून होते त्यामुळे त्यांनी नैराश्यातून स्वतःवर गोळीबार केला की अन्य कुणी त्यांच्यावर गोळी चालवली? या बाबी पोलिस तपासात व जॉर्ज यांच्या जवाबानंतर निष्पन्न होणार आहेत. झालेल्या घटनेची फिर्याद सुझैना याकूब जार्ज वय ३२ राहणार गाडीतल उन्नती नगर,ढेरे बिल्डिंग रूम नंबर ३ , हडपसर पुणे यांनी दिल्यानुसार शहर पोलीस स्टेशनला गु.र.न.८७/२०१९ भा.द.वि. कलम ३०७ आर्म अँक्ट कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक १० एप्रिलला शहर पोलीस स्टेशनला सायंकाळी ६:३० वाजेला जिल्ह्या पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी गोळीबार प्रकरणाबद्दल पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन राठोड व शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांची भेट घेतली.आरोपीचा सुगावा लागला असून त्या दिशेने तपास चक्र अधिकारी व कर्मचारी फिरवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. घटनेतील मारेकरी कोण हे गुलदस्त्यातच असल्याचे दिसत आहे.

Add Comment

Protected Content