ऐतीहासीक क्षण : ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ऋषी सुनक !

लंडन-वृत्तसंस्था | ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची निवड निश्‍चीत झाली असून या माध्यमातून एका नव्या इतिहासाची नोंद झाली आहे.

ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय वंशाचे नेते ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान झाले आहेत. सुनक यांच्यासमोर आणि पेनी मॉर्डंट यांचं आव्हान होतं. मात्र, पेनी मॉर्डंट यांनी माघार घेतल्यानं ऋषी सुनक नवे पंतप्रधान झाले आहेत. ऋषी सुनक आता ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान असणार आहेत. इन्फोसीसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे ते जावई आहेत. त्यांनी यापूर्वी अर्थमंत्री म्हणून देखील काम केलं आहे.

ऋषी सुनक हे ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान बनले असून त्यांना दोन वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे. त्यांची नियुक्ती ही ऐतीहासीक मानली जात असून भारतावर जवळपास दीड शतके राज्य करणार्‍या ब्रिटनवर भारतीय वंशाच्या व्यक्तीकडे पंतप्रधानपदाची धुरा येणे ही बाब लोकशाहीची महत्ता दर्शविणारी मानली जात आहे.

Protected Content