कोण नवनीत राणा? तिला महत्व द्यायची गरज नाही – विद्या चव्हाण

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – उठसूट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा अपमान करणे कितपत योग्य आहे, कोण नवनीत राणा? नवनीत राणा कोण आहे हे सर्वाना माहित आहे, बारमध्ये काम करायची, तिला महत्व द्यायची गरज नाही, असे वादग्रस्त वक्त्यव्य विधान राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी केले आहे,
मुंबईत आज बीकेसी संकुलात मुख्यमंत्र्यांची सभा आहे, तर दुसरीकडे ठाकरे सरकारला सद्बुद्धी यावी यासाठी आमदार आणि खासदार असलेले राणा दाम्पत्य नवी दिल्लीच्या हनुमान मंदिरात आरती करण्यासाठी रवाना झाले आहे. यावर कोण नवनीत राणा, केवळ माध्यमांमध्ये या चर्चेत राहण्यासाठीच ते असले उद्योग करीत आहेत. खोटे जात प्रमाणपत्र देवून खासदार झाल्या, एवढे महत्व द्यायची गरज नाही, असेही विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे.
रवि राणा यांनी निवडणुकीपूर्वी झाकण नसलेले प्रेशर कुकर महिलांना वाटले होते. तुम्ही मला मतदान करा मग झाकण देतो असे उत्तर रवि राणा यांनी प्रेशर कुकरला झाकण नाही याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलांना त्यावेळी दिले होते, यावरून राणा दाम्पत्याची कुवत लक्षात येते, असेही चव्हाण म्हणाल्या.

 

 

 

 

 

 

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!