पाचोर्‍यात सरदार पटेल जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

पाचोरा, प्रतिनिधी | परिसरातील गुर्जर समाजबांधवांतर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पाचोरा परिसर गुर्जर समाजातील रेवे, लेवा, दोडे, सुर्यवंशी, बडगुजर, गुर्जर यासर्व उपजातींमधील समाज बांधवांची बैठक ध्येय करिअर ऍकेडमीच्या दालनात पार पडली. यात समाजातील वरिष्ठ मान्यवर, युवावर्ग मोठया संख्येने उपस्थित होता. यावेळी गुर्जर समाज भुषण लोहपुरुष सरदार वल्ताभभाई पटेल यांची जयंती निमित्त कार्यक्रमांच्या आयोजनाची माहिती देण्यात आली.

सरदार पटेल जयंती निमित्त गुर्जर संघटन काळाची गरज या विषयावर पाचोरा परिसर मर्यादित निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात स्पर्धकांनी आपला निबंध २५० शब्दात फुल स्क्वेफ कागदावर एका बाजुने लिहून दि. २९ ऑक्टोबर शनिवारी दुपारी १२ पर्यंत हाय टेक कॉम्पुटर किंवा शिव एम्पोरिम येथे जमा करावेत. यात प्रथम तीन विजयी स्पर्धकांना सदर निबंधाचे वाचन करावं लागणार आहे. तर दि. ३० ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी ९:३० वाजता वर्ग के. जी. ते इयत्ता ८ वी मधील विद्यार्थी – विद्यार्थीनीसाठी मोबा – टीव्ही याचे परिणाम व इयत्ता ९ ते पदवीधर पर्यत विद्यार्थी – विद्यार्थीनीसाठी माझे ध्येय त्यासाठी अपेक्षा या विषयावर प्रत्येकी सात मिनीट असलेली वत्कृत्व स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे.

यास्पर्धेत विजयी स्पर्धकांचा बक्षिस समारंभ व सर्व कार्यक्रम दि. ३१ ऑक्टोबर सोमवार रोजी सकाळी ९:३० वाजता पाचोरा शहरातील ध्येय करिअर अँकेडमीतील स्वातंत्र्य सैनीक कै. आण्णासाहेब दामोदर लोटन महाजन सभागृहात संपन्न होणार आहे. यामध्ये समाजातील मान्यवर मनोगत व्यक्त करणार आहेत. तरी पाचोरा शहर व परिसरातील गुर्जर समाज तथा पोटजाती मधील सर्व बालके, युवावर्ग सह बंधु – भगिनींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content