Home Cities अमळनेर धक्कादायक : जीवेठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार

धक्कादायक : जीवेठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार

0
138


अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका 25 वर्षीय महिलेला मुलाला आणि वडिलांना जीवेठार मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा धक्कादाय प्रकार सामोर आला आहे. याप्रकरणी अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर तालुक्यातील एका गावात 25 वर्षे महिला हे आपल्या मुलगा आणि वडील यांच्यासोबत वास्तव्याला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून गावात राहणारा संशय आरोपी सुखदेव रामसिंग भील याने महिलेला धमकी दिली तसेच तिच्या मुलाला आणि वडिलांना जीवेठार मारण्याची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. दरम्यान या घटनेबाबत महिलेने अमळनेर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी सुखदेव रामसिंग भिल यांच्यावर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल करीत आहे.


Protected Content

Play sound