जुन्या वादातून चौघांकडून महिलेचा विनयभंग

धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | धरणगाव शहरातील चोपडा रोड परिसरात राहणाऱ्या एका 35 वर्षीय महिलेला जुन्या भांडणाच्या कारणावरून अश्लील शिवीगाळ करत विनयभंग केल्याचा प्रकार धरणगाव न्यायालयात घडला आहे. या संदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव शहरातील चोपडा रोड परिसरात 35 वर्षीय महिलाही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून गावात राहणारे सागर विजय कंखरे राहुल विजय कंखरे विजय पुना कंखरे आणि राजेंद्र पूना कंकरे यांच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार त्यांच्या तक्रारीवरून मंगळवारी 29 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता धरणगाव न्यायालयात कामकाज होते. यावेळी वरील चौघांनी महिलेला अश्लील हातवारे करून त्यांचा विनयभंग केला आहे. महिलेने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार चौघांवर धरणगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल चंदुलाल सोनवणे करीत आहे.

Protected Content