धक्कादायक : गतीमंद मुलीवर अत्याचार; नराधमाला अटक !

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या गतिमंद असलेल्या मुलीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवार २ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील भडगाव तालुक्यातील एका गावात गतिमंद मुलगी ही वास्तव्याला आहे. त्याच गावात राहणारा संशयित आरोपी वाल्मीक नरसिंग पवार उर्फ जीभू याने पिडीत गतिमंद असल्याचा फायदा घेत १ एप्रिल रोजी पीडित मुलीवर जबरदस्ती अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही बाब पीडित मुलीच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मंगळवार २ एप्रिल रोजी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार मंगळवारी २ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता संशयित आरोपी वाल्मीक नरसिंग पवार यांच्या विरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर हे करीत आहे.

Protected Content