उन्मेष पाटील यांचा खासदारकीचा राजीनामा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असलेले खासदार उन्मेषदादा पाटील यांनी आज आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

खासदार उन्मेष पाटील हे आपल्या सहकार्‍यांसह आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत. ते भाजपमधून निवडून आलेले असल्याने थेट दुसर्‍या पक्षात दाखल होऊ शकत नाही. असे झाल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपुर्द केला आहे.

यानंतर आता उन्मेष पाटील हे लवकरच शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content