मुंबई प्रतिनिधी । आज सकाळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते राज्यपालांच्या भेटीला गेले असून ते त्यांनी आमदारांच्या पाठींब्याचे पत्र सुपुर्द करून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.
सोमवारी सकाळपासूनच राज्यातील राजकीय घडामोडी गतीमान झाल्या. यातच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली. याप्रसंगी एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते. त्यांनी आपापल्या पक्षाच्या आमदारांचा पाठींबा असणारी पत्रे राज्यपालांना सुपुर्द केल्याची माहिती आता समोर आली आहे. राज्यपाल अद्याप दिल्लीहून पोहचले नसल्याने महाविकास आघाडीने आपला सत्ता स्थापनेचा दावा आणि आमदारांच्या पाठींब्याचे पत्र राजभवनातील सचिवांना प्रदान करण्यात आले.
यानंतर महाआघाडीच्या नेत्यांनी याबाबतची माहिती दिली. जयंत पाटील यांनी महाआघाडीकडे १६२ आमदारांची पाठींबा असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.