महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या : राहुल गांधी

rahul gandhi 4

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील राजकारणाच्या मुद्द्यावर आज सकाळी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जोरदार पडसाद उमटले. महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली असल्याची टीका, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली. दरम्यान, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात संसद परिसरात निदर्शनेही करण्यात आली.

 

महाराष्ट्रातील राजकारणाच्या मुद्द्यावर जोरदार गोंधळ उडाला. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये काँग्रेसच्या खासदारांनी या राजकारणाचा निषेध केला. लोकसभेत प्रश्नकाल सुरू असताना काँग्रेस खासदारांनी घोषणाबाजी केली. यात ‘संविधानाची हत्या बंद करा’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी राहुल गांधी म्हणाले, मी सभागृहाला विचारू इच्छितो. परंतु, महाराष्ट्रात आधीच लोकशाहीची कत्तल झालेली आहे त्यामुळे विचारण्यातही काहीच अर्थ राहिलेला नाही. विरोधकांच्या घोषणाबाजी आणि गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज स्थगित करावी लागले. यानंतर काँग्रेस खासदारांनी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात संसद परिसरात निदर्शने केली.

Protected Content