मुंबई प्रतिनिधी । संघ आणि भाजपला खरंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी प्रेम असेल तर त्यांनी शिवेंद्रराजे भोसले यांना मुख्यमंत्री करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक अमोल मिटकरी यांनी केली आहे.
अमोल मिटकरी आणि डॉ. अमोल कोल्हे यांनी या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीसाठी तुफानी सभा घेतल्या असून त्यांना उदंड प्रतिसाददेखील लाभला आहे. दरम्यान, सध्या सुरू असणार्या राजकीय अनिश्चिततेच्या वातावरणावर अमोल मिटकरी यांनी एका मुलाखतीतून भाष्य करत शिवेंद्रराजे भोसले यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. यात ते म्हणाले की, भाजपने २०१४च्या निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला. मात्र हे प्रेम बेगडी होते. त्यांनी जनतेशी दगाबागी केली. याचेच प्रतिबिंब नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निकालातून उमटले आहे. तसेच भाजपने उदयनराजे भोसले यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. आताही जर संघ आणि भाजपला शिवरायांविषयी प्रेम असेल तर त्यांनी शिवेंद्रराजे भोसले यांना मुख्यमंत्री करावे असे आवाहन अमोल मिटकरी यांनी या मुलाखतीत केले.