ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रावेरात रूट मार्च

WhatsApp Image 2019 11 04 at 8.29.19 PM

रावेर, प्रतिनिधी | येथे आज ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी रूट मार्च काढण्यात आला.

आज सोमवार ४ नोव्हेंबर रोजी रावेर येथे पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांचे संयुक्तपणे रूट मार्च करण्यात आले. शहरातील नागझिरी चौक येथे आगामी ईद ए मिलाद सणा निमित्त दंगा नियंत्रण योजना सायंकाळी ५ वाजून १९ मिनिटे ते ६ वाजून ३० मिनिटांपर्यत करण्यात आली. तसेच ६ वाजून ३० मिनिटांपासून ते ७ वाजून १५ मिनिटांपर्यत रावेर शहरातील ईद ए मिलाद मिरवणूक मार्गावरून पथसंचलन करण्यात आले. यावेळी रावेर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी रामदास वाकोडे, निंभोरा पो. स्टे. प्रभारी स. पो. नि. जानकर साहेब, पो. उप. निरी. कदम, पो. उप. निरी. वाघमारे, रावेर पो. स्टे चे १० कर्मचारी, आरसीपीचे १६ कर्मचारी, ३५ होमगार्ड सहभागी झाले होते.

Protected Content