रोटरी क्लब मिडटाऊनतर्फे पुस्तकांचे वाटप

जळगाव, प्रतिनिधी पूज्य साने गुरुजी यांच्या पुण्यतिथीचे  औचित्य साधून आज रोटरी क्लब जळगाव मिडटाऊनतर्फे  कचरा वेचणाऱ्या मुलांच्या शाळेला लायब्ररीसाठी १२५  पुस्तकांचे वाटप करण्यात आले .  

 

वर्धिष्णू या संस्थेतर्फे कचरा वेचणाऱ्या मुलांसाठी शाळा चालविली जाते. रोटरी क्लब जळगाव मिडटाऊनतर्फे  या शाळेच्या लायब्ररीसाठी प्रेरणादायी कथा, गाणी, गोष्टी व शैक्षणिक पुस्तके अशी एकूण १२५ पुस्तकांचे वाटप करण्यात आले.  या उपक्रमासाठी  आर्थिक योगदान रो.शेखर प्रभुदेसाई , डॉ. अपर्णा मकासरे, डॉ. रवी महाजन यांनी दिले. वर्धिष्णू या संस्थेचे अध्यक्ष अद्वैत दंडवते व प्रणाली दंडवते यांनी या उपक्रमाबद्दल सर्व दात्यांचे व क्लबचे आभार मानले  या कार्यक्रमास डॉ. अपर्णा मकासरे, अनिल अग्रवाल, शंकर पटेल, डॉ. विवेक वडजीकर, तारीख शेख , अनिल अग्रवाल,  सचिव शशी अग्रवाल, अध्यक्ष डॉ. रेखा महाजन आदी सदस्य उपस्थित होते.  प्रकल्पप्रमुख अनिल  अग्रवाल यांनी  देखील सर्व दात्यांचे व उपस्थितांचे आभार

 

Protected Content