जनकल्याण यात्रेची दखल : खा. उन्मेषदादांवर आली ‘ही’ मोठी जबाबदारी !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खासदार उन्मेषदादा पाटील यांनी जनकल्याण यात्रेच्या माध्यमातून केलेल्या कामाची केंद्रीय पातळीवरून दखल घेण्यात आली असून त्यांच्यावर आता प्रदेश भाजपने मोठी जबाबदारी सोपविली आहे.

केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविल्या जाणार्‍या कल्याणकारी योजनांचा लाभ कसा, कोठे व कशा पद्धतीने मिळेल यासाठी माता बंधू भगिनी युवा, आत्मनिर्भर होण्यासाठी उत्सुक शेतकरी, उच्च शिक्षणासाठी विदयार्थी, नव उद्योजक सर्व घटकांना घरपोच माहिती मिळावी यासाठी लाखो माहितीपत्रक, प्रत्येक तालुक्यात एल ई डी व्हँन व चित्र रथाव्दारे दि.२४ जून पासून पंधरा दिवस जळगाव लोकसभेतील प्रत्येक गावात, शहरात पंतप्रधान जनकल्याण यात्रा घरोघरी जाऊन प्रसिध्दी करण्यात यशस्वी ठरली होती.

दरम्यान, स्थानिक पातळीवर खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या अभिनव उपक्रमाची दखल प्रदेश भारतीय जनता पक्षाने घेतली आहे. या अनुषंगाने प्रदेश भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अंत्योदयाचा विचार व शेवटच्या घटकाला आत्मनिर्भर करण्यासाठी तयार केलेल्या केंद्र सरकारच्या शेकडो योजनांची प्रचार, प्रसार व प्रसिद्धी करीता खासदार उन्मेश दादा पाटील यांची ‘महाराष्ट्र प्रदेश संयोजक’ पदी निवड करण्यात आली आहे.

मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते खासदार उन्मेषदादा पाटील यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी खासदार पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की प्रदेश भारतीय जनता पक्षाने दिलेली नवी जबाबदारी मला नवचैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा देणारी आहे. पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर दर्शवलेला विश्वास मी सार्थ ठरवेन, अशी ग्वाही देतो. सर्वांना सोबत घेऊन पक्षाच्या माध्यामातून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारच्या योजना या तळागाळापर्यंत पोहचवीण्यासाठी सदैव निष्ठेने कार्य करीत राहीन. राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने नव महाराष्ट्राच्या नवनिर्मितीचा विचार प्रत्यक्षात साकारण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातील वंचीत गरजू घटकांपर्यंत योजनांची माहिती पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करेन अशी भावना व्यक्त केली.

Protected Content