पायर्‍यांवर बसण्यावरून वाद : दोन गटांमध्ये तुफान हाणामारी

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नगरपालिका सभागृहाच्या पायर्‍यांवर बसण्याच्या कारणावरून शहरातील एकाच समुदायाच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली असून या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सावदा पोलीस स्थानकात एकाच समाजाच्या दोन गटांनी फिर्याद दिल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील पहिली फिर्याद ही नवाब उस्मान तडवी ( वय ३९, रा. काजीपुरा, वरा तडवी वाडा ) यांनी दिली आहे. यात म्हटले आहे की, काल दिनांक २८ रोजी काजीपुरा भागातील नगरपालिका सभागृहाच्या पायर्‍यांवर बसण्यावरून मुलांमध्ये भांडण झाले होते. यानंतर, सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास काजीपुरा भागातील महिलांच्या शौचालयाजवळ जमावाने त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. यात शाहरूख रशीद तडवी, रूक्साना कादर तडवी, मुसकान शरीफ तडवी, जायेदा अमीन तडवी हे जखमी झाले.

हा हल्ला मुराद गैरखा तडवी, जावेद शेरखॉ तडवी नवाज कासम तडवी, सलीम चांदखॉँ तडवी, रमजान चांदखा तडवी, नवाज रमजान तडवी, अमीन रमजान तडवी, सलमान जुम्मा तडवी, आदिल शब्बीर तडवी, अक्रम करीम तडवी, खातुनबाई चॉदखॉ तडवी, अशीनबाई दगडु तडवी, दगडु नमाज तडवी, सुपडाबाई अय्युब तडवी, शबानाबाई मुराद तडवी, वैतुल करीम तडवी, व सायराबाई सायवु तडवी, व इतर १० ते १२ लोक (सर्व रा.काझीपुरा, तडवीवाडा, सावदा ता. रावेर) यांनी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यानुसार सावदा पोलीस स्थानकात भादंवि कलम३०७, ३२४,३२३,३३७,५०४, १४३,१४७,१४९ तसेच ३७ (१)(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

दरम्यान, यातील दुसरी फिर्याद ही अमीर रमजान तडवी ( वय १९, रा. काजीपुरा, खालचा तडवी वाडा, सावदा) याने दिली आहे. यानुसार, काल सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तो आपल्या मित्रांसह नगरपालिका सभागृहाच्या पायर्‍यांवर बसलेला होता. येथे त्याचे मुलांशी भांडण झाल्यामुळे त्यांनी याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनला दिली. याचा राग येऊन जमावाने फिर्यादीसह त्याचा भाऊ मुराद तडवी व आई दगुबाई तडवी यांना मारहाण केली. यात महिलांनी येऊन त्यांना शिवीगाळ करत धमकावले. तर, इतरांनी त्यांना मारहाण केली.

हा हल्ला १) सुलतान कादर तडवी .२)अमीन कादर तडवी ३)शाहरुख रशिद तडवी; राजु अनवर तडवी; नवाब उस्मान तडवी; समीर सलीम तडवी; रहेमान परबत तडवी; जमीर हमीद तडवी; शेखर गफ्फार तडवी; अरवाज राजु तडवी; मोईन आमद तडवी ; आसिफ अहमद तडवी ; जुबेर अल्लाउद्दीन तडवी ;अनिस हबीब तडवी, आमद चॉदखा तडवी, सखुबाई शरीफ तडवी; रशिदा आमद तडवी; गुलशान रहेमान तडवी; हसीना खलील तडवी, दगुबाई सलीम तडवी, (सर्व रा. काझीपुरा, तडवीवाडा, सावदा ता. रावेर) व इतर अज्ञात पाच-सहा जणांनी केल्याचे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यानुसार, त्यांच्या विरोधात भादंवि कलम ३०७, ३२३, ३२४, ३३७, ५०४, १४३,१४७, १४९ तसेच कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोन्ही प्रकरणांचा तपास सपोनि देविदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय समाधान गायकवाड, उमेश पाटील आणि त्यांचे सहकारी करत आहेत.

Protected Content