राज्यस्तरीय अधिवेशनास कोळी बांधवानी उपस्थित राहावे : जि. प. गटनेते प्रभाकर सोनवणे(व्हिडिओ)

यावल, प्रतिनीधी | राज्यातील श्रीक्षेत्र शेगाव येथे होणाऱ्या आदिवासी कोळी महासंघ व आदिवासी संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अधिवेशनास जळगाव जिल्ह्यातील टोकरे कोळी समाज बांधवा मोठया संख्ये उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी केले आहे.

 

या शेगाव ( विदर्भ ) येथे रविवार ७ नोव्हेंबर रोजी कोळी समाजाचे राज्यस्तरीय भव्य अधिवेशन व महामेळाव्यास राज्याचे माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. हे अधिवेशन स.९ ते सायंकाळ ५ या वेळात हॉटेल कृष्ण कॉटेज, कान्हा उत्सव हॉल,खामगाव रोड या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. ह्या अधिवेशनात आदिवासी कोळी जमात व अन्य ३३ अन्यायग्रस्तं जमातींचे समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनाही विशेष आमंत्रित करण्यात आलेले आहे. या अधिवेशनास समाज बांधवानी उमोठ्या संख्यने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा परिषदचे गटनेते तथा प्रदेशाध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी आदिवासी कोळी समाज बांधवाच्या बैठकीत आवाहन केले आहे.
यावल तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात आदिवासी कोळी समाज बांधवाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी या बैठकीत पाडळसा येथील सरपंच खेमचंद कोळी, वढोदा सरपंच संदिप सोनवणे , कोळन्हावी सरपंच विकास सोळंके, बामणोद राहुल तायडे, समाधान सोनवणे, मनवेल येथील पत्रकार गोकुळ कोळी, प्रमोद सोनवणे, मोहन सोनवणे, योगेश कोळी, अमर कोळी, गोकुळ सोनवणे, सागर कोळी, चिंधु कोळी, किरण तायडे, पांडुरंग महाले, विनोद झाल्टे, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व समाज बांधव उपस्थित होते. या अधिवेशनात सामाजिक लढ्यासाठी पुढील दिशा ठरविण्यात येणार असून अनेक मोठे निर्णयही घेतले जाणार आहेत. तसेच अधिसंख्य कर्मचारी,अधिकारी यांचे वेतन,वेतनवाढ तसेच सेवानिवृत्तीधारकांचे देय, निवृत्तीलाभ, जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी समाज बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3131078347136524

Protected Content