कृष्णापुरी भागातील महिलांनी दिले विविध मागण्यांसाठी निवेदन

पाचोरा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागातील काही अतिक्रमणासह गल्लीत भूमिगत गटारी करुन रस्त्याच्या मधोमध येणारे विजेचे पोल रस्त्याच्या एका बाजूला करण्यात यावे. यासह विविध मागण्यांसाठी पाचोरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांना स्थानिक महिलांनी निवेदन दिले.

पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागातील काही  घराचे न काढलेल्या अतिक्रमणाचे अपूर्ण राहीलेले काम पूर्ण करुन तसेच समोरील प्लॉटधारक यांचे झालेले अतिक्रमण देखील काढून गल्लीत भूमिगत गटारी करुन गल्लीतील रस्त्याच्या मधोमध येणारे विजेचे पोल रस्त्याच्या एका बाजूला करण्यात यावे या विविध मागण्यांसाठी आज गुरुवार, दि. १६ जून रोजी पाचोरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांना स्थानिक महिलांनी निवेदन दिले.

सविस्तर वृत्त असे की, “कृष्णापुरी भागातील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते. ते अतिक्रमण संपूर्ण गल्लीत निघाले परंतु जेथून गल्लीत जाण्यासाठी सुरुवात होते. त्याच्या घराचे अतिक्रमण मात्र नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काढले नाही. संपूर्ण गल्लीत जर तुम्हाला कोठेही अडथळा निर्माण झाला नाही तर तुम्ही एका घरासाठी ते काम अपूर्ण का राहू दिले आहे ?  हा गल्लीतील इतर नागरीकांवर अन्याय झाला आहे. त्या एका घराचे अतिक्रमण त्वरीत काढून तेथे रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे जनतेला होणारा त्रास यांचा विचार करुन भूमिगत गटार करुन मिळावी.

कृष्णापुरी भागातील त्या गल्लीत अतिक्रमण काढले आहे. तेथे समोरील प्लॉटधारक यांना वापर नसून त्यांनीदेखील त्या भागात अतिक्रमण केले आहे ते देखील अतिक्रमण लेआऊटनुसार आपण काढणार होते. त्यांनी देखील गल्लीत सांडपाणी सोडले आहे. गल्लीतील रहिवाश्यांना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. अतिक्रमणमध्ये बरेच घरांचे बाथरुम देखील तोडले गेले आहेत. महिलांना सकाळी ४ वाजेपासून उठून आंघोळ करावी लागते. कारण आंघोळीसाठी त्यांना बाथरुमदेखील राहिलेला नाही. त्यांना त्या महिलांचे आंघोळीसाठीदेखील हाल होत आहे. असे असून देखील संपुर्ण गल्लीचे अतिक्रमण निघाले व त्या एका घराचे अतिक्रमण निघाले नाही.

हा अन्याय आम्ही जास्त दिवस सहन करणार नाही. गल्लीत लहान लहान मुल आहेत यांचा विचार करुन आपण काही घराचे अर्धवट राहीलेले अतिक्रमण काढावे व तेथील रस्ता मोकळा करुन दयावा. व समोरील प्लॉटधारक यांचे देखील लेआऊट नुसार त्यांनी केलेले अतिक्रमण हे देखील काढावे अशा मागणीचे निवेदन स्थानिक महिलांनी दि. १६ जुन रोजी न. पा. मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी मयुर महाजन, सिमा माळी, ज्योती पाटील, रत्ना पाटील, मनिषा पाटील, निर्मला महाजन, सुरेखा महाजन, सखुबाई महाजन, रुपाली महाजन, मंगलबाई पाटील उपस्थित होत्या.

Protected Content