जळगाव प्रतिनिधी । शिवाजीनगर हुडको परिसरात घरफोडीच्या प्रयत्न करणार्या तिघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील तिसऱ्या आरोपीला शहर पोलीसांनी मध्यरात्री गस्त असतांना अटक केली.
हकीम नूर मोहंमद शहा (वय २१) रा. गेंदालाल मिल असे संशयित आरोपीचे नाव असून गेल्या दोन महिन्यांपासून फरार झाला होता. त्याला शुक्रवारी रात्रीच्या सुमारास संशयित रित्या फिरतांना अटक केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील शिवाजी हुडको परिसरात घरफोडी करण्याच्या प्रत्नात असलेल्यांचा कट परिसरातील नागरिकांनी उधळून लावल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. यात दोन चोरट्याना नागरिकांनी रंगेहाथ पकडून चांगला चोप देत त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले होते. तर संशयित आरोपी हकीम नूर मोहंमद शहा हा घटना घडल्यापासूून फरार होता. हकीम शहा हा शुक्रवारी रात्रीच्या सुमारास राधाकृष्णनगर परिसरात संशयित रित्या फिरत असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे तेजस मराठे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ योगेश इंधाटे व होमगार्ड यांना सोबत घेत हकीम शहाला अटक केली.