लॉकअपचे व्हिडीओ करणे भोवले; एमआयडीसी पोलीसात एकावर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात असलेल्या संशयितांशी बोलतांना व्हिडीओ शुटींग करणाऱ्या तरूणावर शासकीय कामाची गोपनियता भंग केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, दोन दिवसांपुर्वी शहरातील महावितरण कार्यालयात झालेल्या प्रकारणात अटकेत असलेले चाळीसगाव तालुक्यातील ३० ते ४० शेतकऱ्यांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केले होते. २७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास प्रविण शिवाजी मराठे (वय-४५) रा. हिरापूर रोड इच्छादेवी नगर, चाळीसगाव हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात आला. त्याठिकाणी अटकेत असलेले संशयित आरोपींना भेटण्यासाठी आला. भेटत असतांना त्यांनी लॉकअप समोर व्हिडीओ शुट केली. व्हिडीओ शुट करण्यास कोणतीही परवानगी नसतांना शासकीय कामाची गोपनियता भंग केल्याप्रकरणी पोलीस नाईक राजेंद्र ठाकरे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि विशाल सोनवणे करीत आहे. 

Protected Content