वाळू वाहतूक करणाऱ्ऱ्या ट्रॅक्टर जप्त; चालकावर गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या आव्हाने शिवारातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर जळगाव तालुका पोलीसांनी कारवाई करत वाळूने भरलेले ट्रॅक्टर जमा केले. याप्रकरणी गुरुवार २२ जून रोजी सकाळी ४ वाजता ट्रॅक्टर चालकाविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरापासून जवळ असलेल्या गिरणानदी पात्रातून बेसुमार वाळू वाहतूक केली जात आहे. दरम्यान गुरुवारी २२ जून रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास जळगाव  पोलीस कर्मचारी गस्तीवर असताना बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ सीव्ही ६१९४) पोलिसांनी पकडले. वाळू वाहतुकीबाबत ट्रॅक्टर चालक प्रदीप राजेंद्र कोळी (वय-२५) रा.विरवाडे ता. चोपडा जि.जळगाव याला वाळू वाहतूकीचा परवाना विचारला असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. दरम्यान पोलीस कर्मचारी मनोज पाटील यांनी ट्रॅक्टरवर कारवाई करत वाळूने भरलेले ट्रॅक्टर जमा केले. पोलीस नाईक मनोज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक प्रदीप राजेंद्र कोळी (वय-२५) याच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय भालेराव करीत आहे.

Protected Content