शिरसोलीत आढळला एकाचा मृतदेह

muder 3

 

जळगाव । दापोरा येथील एका इसमाचा मृतदेह आज सकाळी शिरसोली गावातील शॉपींग कॉम्पलेक्स परिसरात आढळून आला आहे. विनोद भिला नन्नवरे (वय 40, रा.दापोरा, ता.जळगाव) असे मृत इसमाचे नाव आहे.

 

नन्नवरे हे जळगाव महानगरपालिकेत गेल्या 10 वर्षांपासून कर्मचारी म्हणून काम करत होते. गेल्या 6 महिन्यांपासून पत्नी मालती नन्नवरे या मुलांसोबत माहेरी शिरसोली येथे वडिलांकडे राहत होत्या. नन्नवरे हे मंगळवारी रात्रीपासून बेपत्ता होते. आज सकाळी ९ वाजता शिरसोली गावात त्यांचा मृतदेह आढळुन आला आहे. दरम्यान, मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिरसोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळुन आल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांची ओळख पटवली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, राजेश आणि जयेश ही दोन मुले, दोन भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे. या प्रकरणी पोलीस पाटील यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content