Home Cities जळगाव भारत विकास परिषद जळगाव शाखा : नूतन कार्यकारिणी दायित्व ग्रहण समारंभ

भारत विकास परिषद जळगाव शाखा : नूतन कार्यकारिणी दायित्व ग्रहण समारंभ

0
40


 

जळगाव, प्रतिनिधी । भारत विकास परिषद, शाखा जळगाव चा नूतन कार्यकारिणीचा दायित्व ग्रहण समारंभ दि. ३१ मे रोजी काही मोजक्या मान्यवरांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करत आणि ऑनलाईन पद्धतीने झूम ऍपद्वारे इतर सभासदांसमक्ष आयोजित करण्यात आली होती.

भारत विकास परिषद, शाखा जळगावचा नूतन कार्यकारिणी दायित्व ग्रहण समारंभात प्रत्यक्ष उपस्थितांमध्ये देवगिरी प्रांत अध्यक्ष तुषार तोतला, जेष्ठ सभासद रविंद्र लढ्ढा व प्रशांत महाजन तसेच शाखेचे मावळते पदाधिकारी प्रसन्न मांडे, विशाल चोरडिया, चेतन दहाड, अनुक्रमे अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष आणि शाखेचे नूतन पदाधिकारी उज्वल चौधरी, डॉ. योगेश पाटील व गिरीश शिंदे अनुक्रमे अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष हे उपस्थित होते.ऑनलाईन पद्धतीने झूम ऍप च्या द्वारे साधारण २० सभासद जुळलेले होते.यावेळी मावळते सचिव विशाल चोरडिया ह्यांनी गतवर्षीच्या कार्यकाळाचा आढावा सादर केला. प्रांत अध्यक्ष तुषार तोतला ह्यांनी नूतन पदाधिकारी उज्वल चौधरी, डॉ. योगेश पाटील व गिरीश शिंदे ह्यांना दायित्व ग्रहण शपथ दिली. शाखेचे मावळत्या पदाधिकाऱ्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांकडे पिन सुपूर्द करत पदभार सोपविला. मावळते अध्यक्ष प्रसन्न मांडे ह्यांनी त्यांच्या गतवर्षीच्या कार्यकाळा संबंधात मनोगत व्यक्त केले. त्यानंतर तुषार तोतला आणि रविंद्र लढ्ढा ह्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना कोरोना ह्या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर शाखा संचलनासंदर्भात मार्गदर्शन केले. नूतन अध्यक्ष उज्वल चौधरी ह्यांनी येत्या वर्षात राबवण्यात येणाऱ्या प्रकल्प आणि शाखेचे अनिवार्य कार्यक्रमाचा संकल्प व्यक्त करीत मनोगत मांडले. नूतन सचिव डॉ. योगेश पाटील ह्यांनी आभार मानले.


Protected Content

Play sound