शिवसेनेतर्फे मनपावर धडक मोर्चा : आयुक्तांना गाजर देवून निषेध आंदोलन (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 11 06 at 2.48.26 PM

जळगाव, प्रतिनिधी | आज शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी जळगावात नागरी सुविधांचा ठणठणाट असतांना प्रशासन मात्र फक्त आश्‍वासनांची गाजरेच देत असल्याने  शिवसेनेतर्फे आयुक्तांना गाजरे भेट देऊन अनोखे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी मनपा विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, नगरसेवक नितीन बरडे, प्रशांत नाईक, अमर जैन, जितु मुदंडा आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.

ठेकेदाराचे लाड कशासाठी केले जात आहेत ? हे लाड सत्ताधारी करीत आहे की प्रशासन करीत आहे असा प्रश्न सुनील महाजन यांनी आयुक्त उदय टेकाळे यांना निवेदन देतेवेळी उपस्थित केला. याप्रसंगी सत्ताधारी व अधिकारी यांच्याकडून केवळ आश्वासनाचे गाजरे दिली जात असल्याने शिवसेनेतर्फे आयुक्तांना गाजरे भेट देण्यात आली. रस्त्यांवरील खड्ड्यामध्ये नेमका रस्ता कुठय हे शोधाव लागतय शहरात जागोजागी कचरा साचला आहे. शहरात सर्वत्र कचराच दिसतोय. शहरातील कचरा त्वरित उचलण्यात यावा अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली. हा कचरा सात दिवसाच्या आत उचलला गेला नाही तर शिवसेना शहरातील सर्व कचरा मनपात आणून टाकेल असा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान, ठेकेदाराला पेमेंट केले नसते तर दिवाळीच्या तोंडावर शहरात सफाई झाली नसती असे आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला सांगितले. ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे कोणतेही कारण नसल्याचे आयुक्त टेकाळे यांनी स्पष्ट केले. तसेच नोटीसा, सूचना देऊनही ठेकेदाराच्या कामात सुधारणा होत नसेल तर महापालिका वेगळा प्रस्तावाचा विचार करेल असे आश्वासन आयुक्त टेकाळे यांनी दिले.

 पहा फेसबुक लाईव्ह व्हिडिओ 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/781748542265527/

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/462501837711449/

Protected Content