आकस्मित निधीद्वारे शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय – मुनगंटीवार

4Sudhir Mungantiwar 36

मुंबई प्रतिनिधी । राज्यात सर्वत्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असून यात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आकस्मित निधीद्वारे राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होतो.

मुनगंटीवार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीचा शेतकरी हा केंद्रबिंदू होता. या बैठकीत अवकाळी पावसामळे जे नुकसान झालंय त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यांमध्ये जाऊन नुकसानीचा अंदाज घेण्याचे आदेश दिले. राज्यातील सर्व ३४ जिल्ह्यांतील ७० लाख हेक्टरवर अवकाळी पावसाने नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यांपैकी १९ लाख हेक्टवर कापूस, १८ लक्ष हेक्टरवर सोयाबीन व इतर नुकसानीचा अंदाज समोर आहे. आत्तापर्यंत ६० लाख हेक्टरचे पंचनामे झाले आहेत. त्याचबरोबर पीक विम्याचे पैसे मिळताना शेतकऱ्यांना अडचणी होऊ नये यासाठी या बैठकीत चर्चा झाली. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आकस्मित निधीने मदत करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आल्याचे यावेळी मुनगंटीवार यांनी सांगितले.

Protected Content