अल्पसंख्याक मंत्री नवाब मलीक यांनी राजीनामा द्यावा; जामनेरात भाजपचे निवेदन

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे नेते नवाब मलीक यांना मुंबईतील बॉम्ब स्फोटात सहभागी गुन्हेगारांशी संबंध  असल्याच्या संशयावरून ईडीने अटक केली आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जामनेर येथे भाजपाने निवेदनातून केली आहे.

 

देशातील राष्ट्रीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालय यांनी दि.२३ रोजी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना १९९३ मुंबई बॉम्ब स्फोटातील सहभागी गुन्हेगारांशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणी अटक करुन मोठा गोप्यस्फोट केला आहे.हा अत्यंत गंभिर विषय आहे या सर्व प्रकाराची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.हा राष्ट्राच्या अस्मितेचा विषय असुन भ्रष्टाचारी मंत्री नवाब मलिक हे जो पर्यंत मंत्री पदावर राहतील तो पर्यंत निष्पक्ष चौकशी होणार नाही म्हणुन नवाब मलिक यांनी अल्पसंख्यांक मंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा. ते राजीनामा देणार नसतील तर मा. मुख्यमंत्र्यांनी व मा.शरद पवार यांनी त्यांची मंत्रिमंडळातुन तातडीने हकालपटटी करावी. अशी मागणीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी  भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत रामधन बाविस्कर, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी सचिव जितेंद्र रमेश पाटील, शहर अध्यक्ष अतिष छगनराव झाल्टे, उपनराध्यक्ष प्रा.शरद मोतीराम पाटील, न पा गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, नगरसेवक महेंद्र कृपाराम बाविस्कर ,दत्तात्रय सोनवणे, उल्हास पाटील ,दिपक लक्ष्मण तायडे,आनंदा लाव्हरे ,सुहास पाटील ,कैलास नरवाडे ,बाबुराव हिवराळे,सुभाष पवार,श्रीराम वामन महाजन, डॉ.संजीव नामदेव पाटील,अजय प्रकाश पाटील, हेमंत शांताराम वाणी, मनोज आनंवा जंजाळ ,विलास कैलास ढाकरे ,तेजस संजय पाटील , विनायक  देवराम चौधरी,बाळू चव्हाण ,संतोष बारी यांच्या सह पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते

Protected Content