राष्ट्रीय महामार्ग बुऱ्हानपूर रस्ता चौपदरीकरण आधीच्या मूळ मार्गानेच करावे : खासदार रक्षाताई खडसे..

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बुऱ्हानपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग एनएच ७५३बी तळोदा जंक्शन जवळ सुरु होणारा तळोदा – शिरपूर – चोपडा – यावल – फैजपूर – सावदा – रावेर या मध्यप्रदेश महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असलेल्या २४० किमी महामार्गाच्या चौपदरीकरण हे आधीच्या मूळ मार्गानेच रावेर व सावदा शहरातून करण्यात यावे याबाबत खासदार रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री.नितीन गडकरी यांची दिल्ली येथे हिवाळी अधिवेश दरम्यान भेट घेऊन मागणी केली.

बुऱ्हानपूर-अंकलेश्वर महामार्गाच्या दर्जावाढ व चौपदरीकरणसाठी खासदार रक्षाताई खडसे यांचा मागील काही वर्षापासून केंद्र व राज्य स्तरावरील संबंधित मंत्री यांच्याकडे निरंतर पाठपुरावा सुरु होता, त्यानुसार मागील वर्षी सदर राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्यात आलेले असून, सध्या देखभाल दुरुस्तीसाठी रु.६१.०० कोटी निधी वितरीत करण्यात आलेला असून, चौपदरीकरणसाठी डीपीआर तयार होऊन, जमीन संपादनासाठी जिल्हाधिकारी जळगांव यांचे मार्फत ७ डिसेंबर रोजी आदेश देण्यात आले आहे.

त्यामध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील गावांचा समावेश करण्यात येऊन, रावेर व सावदा शहरास चौपदरीकरण मध्ये वगळण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी असल्याने, सदर मार्ग मुक्ताईनगर तालुक्यातून न घेता स्थानिकांच्या मागणीनुसार आधीच्या मूळ मार्गानेच रावेर व सावदा शहरातून घेण्यात यावा यासाठी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री.नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन मागणी केली.

Protected Content