काँग्रेस पक्षातर्फे लिगल सेलची स्थापना

जळगाव प्रतिनिधी । गोरगरीबांना कायदेविषयी मोफत सेवा देण्याकरीता जळगाव शहर जिल्हा काँग्रेसने लिगल सेलची स्थापना केली असल्याची माहिती आज देण्यात आली.

शहर जिल्हा काँग्रेसतर्फे काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत शहर जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये या सेलची घोषणा केली. गरजू, वंचित लोकांना मोफत कायदेविषय मार्गदर्शन, सल्ला देणे, त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी कायदेशीर लढाई लढणे, कौटूंबिक वाद समूपदेशानातून सोडवणे, शिक्षण हक्क कायद्याबाबत पालकांना मोफत मार्गदर्शन करणे, हा या सेलचा उद्देश आहे. केवळ राजकीय अजेंडा न ठेवता या सेलच्या माध्यमातून समाजिक कामे केली जाणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी सांगितले.

अ‍ॅड. प्रभाकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संघटीत केलेल्या या सेलमध्ये अ‍ॅड. रमाकांत पाटील, दिलीप बोरसे, अ‍ॅड. ऋषीकेश सोनवणे, अ‍ॅड. फैसल शेख हे उपाध्यक्ष आहेत. अ‍ॅड. भरत गुजर, अ‍ॅड. संतोष कोळी, अ‍ॅड. रहीम पिंजारी यांच्यावर सरचिटणीसपदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. अ‍ॅड. संजयसिंग पाटील, अ‍ॅड. किरण सोनवणे, अ‍ॅड. प्रशांत शिंपी, अ‍ॅड. जयंत मोरे यांच्यावर सचिवपदाची जबाबदारी टाकली आहे. सहसचिव म्हणून अ‍ॅड. दीपक सपके, अ‍ॅड. नजीर पिंजारी, अ‍ॅड. अजित वाघ, अ‍ॅड. सचिन चौधरी यांची नियुक्ती केली आहे. सल्लागार मंडळात कायम स्वरूपी निमंत्रीत म्हणून अ‍ॅड. भरत देशमुख, अ‍ॅड. रवींद्र बर्डे, अ‍ॅड. गुलाबसिंग पाटील, अ‍ॅड. भगवान पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Add Comment

Protected Content