पाळधी येथे संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी !

धरणगाव (प्रतिनिधी) अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वछता निर्मुलनासाठी संत गाडगेबाबा यांनी मोठे कार्य करून समाजकार्याची दिशा दिली असुन त्यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते ना. गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथे केले. पाळधी येथे श्री संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर लोकनियुक्त सरपंच प्रकाश नाना पाटील, श्रीकृष्ण साळुंके, उद्योगपती शरद कासट, माजी सरपंच सोपान पाटील, उपसरपंच चंदन कळमकर, ग्रा.पं. सदस्य नामदेव माळी, उदय झंवर, संतोष सूर्यवंशी, धोबी समाज अध्यक्ष दीपक सुर्यवंशी, उपाध्यक्ष सागर सुर्यवंशी, सचिव किरण परदेशी, सुरेश सूर्यवंशी, दिलीप सूर्यवंशी, विजू सूर्यवंशी, बापू धोबी, राजू बोरसे, सुरेश वाघ, संजू पांडे, प्रशांत झंवर, हर्षल सूर्यवंशी, अरुण पाटील, मच्छिद्र साळुंके, बंटी फुलपगार, चेतन बोरसे, राकेश फुलपगार, जयेश बोरसे, प्रवीण सूर्यवंशी, आशिष सूर्यवंशी, जितेंद्र सूर्यवंशी, अर्जुन गंगाराम पगारे, लक्ष्मण धोंडू सूर्यवंशी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आधार गुरुजी यांनी केले तर आभार संतोष धोबी यांनी मानले.

Add Comment

Protected Content