हिवाळी अधिवेशनात कोळी जमातीचे प्रश्न मांडावेत

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी  | राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी आदिवासी कोळी जमातीच्या न्याय व हक्कांसाठी तारांकित प्रश्न व लक्षवेधी सुचना मांडाव्यात, अशी मागणी आदिवासी कोळी जमातीचे संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर (गोरगांवले बु.) यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.

 

पत्रकाचा आशय असा की,  महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन दि.१९ ते ३० डिसेंबर दरम्यान नागपुर येथे होत आहे. त्यात राज्यभरातील लोकप्रतिनिधींकडुन प्रलंबित व चालु असे हज्जारों तारांकित प्रश्न व लक्षवेधी सुचना मांडण्यात येऊ शकतात. ह्या अधिवेशनात ठराविक विधेयकांवर चर्चाही होऊ शकते. त्यात आदिवासी कोळी जमातीसाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांचेकडुन तारांकित प्रश्न, लक्षवेधी सुचना मांडण्यात येणार आहेत का ? किंवा तसे विधेयक मंजुर होईल का ? राज्यकर्त्यांना कोळी समाजाचा आक्रोश दिसत नाही का ? असा खडा सवाल जिल्ह्यातील कोळी समाजातर्फे उपस्थित केला जात आहे.

समाजासाठी वाट्टेल ते..आमरण उपोषण हाच पर्याय..

सरकार कोणतेही असो त्यांनी कोळ्यांच्या तोंडाला पानेच पुसलेली आहेत. लोकप्रतिनिधी यांना निवडणुकीच्या वेळेसच आमच्या समाजाचा जाणीव होते. आता सभा, बैठका, मोर्चे, मेळावे भरपुर झालेत. समाजाला एका (जातप्रमाणपत्र) कागदाच्या तुकड्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यापुढे कोळ्यांना न्याय मिळत नसेल तर समाजासाठी वाट्टेल ते करण्याची आमची तयारी आहे. प्रथम तीव्र अन्नत्याग (आमरण) उपोषण करण्यात येईल. त्याची सर्वस्वी जबाबदारी शासन प्रशासनाची असेल. संबंधित विभागाने याची नोंद घ्यावी असे मागणी आदिवासी टोकरेकोळी जमात संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर  यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाव्दारे केली आहे .

Protected Content