रावेरातील ‘त्या’ तीन फळविक्रेत्यांवर पोलीसात गुन्हा दाखल

रावेर प्रतिनिधी । कोरोना विषाणूपासून बचाव व्हावा यासाठी मास्क लावा असे सांगितल्याचा राग आल्याने फळविक्रेत्यांनी प्रांताधिकारी यांच्या वाहनचालकावर हात उगारल्याची घटना आज येथे घडली. याप्रकरणी रावेर पोलीसात तीनही फळविक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कोरानाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा प्रशासन कोरोना विषाणूची जनजागृती वेगवेगळ्या माध्यमातून करत आहे. या पार्श्वभूमीवर फैजपूर प्रांताधिकारी थोरबोले हे आज रावेर शहरात फिरून मास्क लावण्याचे आवाहन करत होते. शहरातील डॉ. आंबेडकर चौकात काही फळविक्रत्यांनी मास्क न लावल्यामुळे त्यांना देखील मास्क बांधा असे प्रांत यांनी सांगितल्यानंतर दोघांमध्ये शब्दीक चकमक झाली. दरम्यान प्रांताधिकारी यांचा गाडीचा चालक उमेश चिंधु तळेकर देखील समजविण्याचा प्रयत्‍न करत असतांना फळविक्रेत्यांना राग आल्याने चालकावर हात उगारल्याचा प्रकार आज सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास घडला. सरकारी वाहनात बसण्यास सुद्धा आरोपितांनी मज्जाव केला व सरकारी कामकाजात अडथडा निर्माण केलेने फिर्याद वरून गुन्हा दाखल असून संशयित आरोपी मलक माजिद मुश्ताक मकल, मलक मुश्ताक मलक गफूर, मलक साजिद मलक गफूर सर्व रा. रावेर आरोपितांना अटक करण्यात आली आहे.

Protected Content