कृत्रिम पाणी टंचाई दूर न केल्यास आंदोलन ; समाधान महाजन यांचा इशारा

भुसावळ, प्रतिनिधी । तालुकयातील वरणगाव नगरपालिकेतर्फे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करण्यात येत असून लवकरच यावर उपाययोजना केली नाही तर शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

वरणगाव शहरात नगरपालिके द्वारा होणारा पाणीपुरवठा हा अनियमित स्वरूपाचा असल्याने दररोज असंख्य तक्रारी पाणीपुरवठा बाबत आहेत. या तक्रारींचा बाबतीत गेल्या महिनाभरापासून नगरपरिषद प्रशासनासोबत वारंवार चर्चा केली असता गोल गोल उत्तरे देऊन नगरपालिकेचे अधिकारी नागरिकांना मूर्ख बनवत आहे. तापी नदीवरील पम्प हाऊसची शिवसेना तालुका प्रमुख समाधान धर्मा महाजन, उपजिल्हा संघटक विलास पांडुरंग मुळे, माजी सरपंच सुभाष धनगर व निलेश सुरडकर यांनी पाहणी केली असता तेथे दोन पैकी एक पापं नादुरुस्त आढळून आला. मागील दिड महिन्यापासून हा पम्प बंद असल्याचे समजले. तो वेळीच दुरुस्त केला असता तर आज नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली नसती. पाईप लाईन दुरुस्तीसाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून निधी आणून देखील पाईप लाईन दुरुस्त झालेली नाही. दोन पैकी एक पंप बंद असल्याने पाण्याचा उचल पूर्णपणे होत नाही. पर्यायाने आठ-दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. याला नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, पाणी पुरवठा अधिकारी हे जबाबदार आहेत. विनाकारण जनतेच्या मनात सरकार विषयक आकाश निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारला बदनाम करण्यासाठी ४५ ते ५० डिग्री तापमान असताना जनतेला पाण्यासाठी भटकावे लागत आहे. पाण्याच्या बाबतीत संगनमताने बरेच राजकारण वरणगावात घडत आहे याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत सांगितले की पंप बंद आहे मला माहीतच नाही व संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवर बोलताना सांगितले की हा विषय आपला ऑफिसमध्ये झाला होता मी आपणास सांगितले होते की संबंधित दुरुस्ती करणारा वीस हजार रुपये ऍडव्हान्स मागत आहे आपण ते दिले नाही म्हणून काम झाले नाही म्हणजे मुख्याधिकारी नगराध्यक्ष यांना माहित असूनही जाणून-बुजून पंपाचे चे काम थांबवण्यात आले आणि जनतेला वेठीस धरण्याचे काम सुरू झाले अशाप्रकारे वरणगाव शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून जनतेस वेठीस धरले जात आहे. सदरची पंप दुरुस्ती त्वरित करावी व जनतेला नियमाप्रमाणे त्यांच्या हक्काचे पाणी द्यावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी यांना देण्यात आलेले आहे. लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असे शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन, जिल्हा संघटक विलास मुळे, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, निलेश सुरडकर, पंकज पाटील, सुभाष चौधरी, सुरेश चौधरी, नितीन देशमुख, विजय सुरवाडे, राहुल बावणे, अब्रार खान फिरोज खान, अतुल पाटील, यांच्यासह शिवसैनिकांनी केली आहे.

Protected Content