चौपदीकरणात नुकसान ग्रस्त नागरिकांना भरपाई देण्याची मागणी (व्हिडीओ)

bhusaval 4

 

भुसावळ प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्ग क्र.6 चे चौपदरीकरणात संपादित जमीनीची नुकसान भरपाईची नागरिकांना रक्कम मिळावी, अशा मागणी माजी नगरअध्यक्ष गोकुळ कारडा यांनी केली असून यासंदर्भातील निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, न.ह.क्र6 वर बी ॲड सी ऑफीस जवळ सर्वे नं 175/अ/1/2+ब/1/3 मध्ये तार कंपाऊड 35*40 फुट म्हणजे 1400 फूट व शेड 35*60 ची बेकरी ॲड केळी वेफर फॅक्टरी आणि ऑफिस अशी 2100 फुटची जागा आहेत. मात्र आज तिथे निशान लावून ही जागा हाइवे चौपदरीकरण्याची आहे. असे सांगण्यात येत आहे. परंतू याचा कधी पंचनामा झाला नसून मला पैसे मिळाले नाहीत. तसेच शेडच्या लागून पूर्वीकडील जागा आहे. तो रास्ता सिंधी कॉलनीकडे जातो. रस्ताला लागून 60 बाय60 फुटाची जागा असून तिथे पक्के बांधकाम करुन कंपाऊड केले असून लोखंडाचे मोठा 30 फुटाचा गेट आहे. तिथे मी खुण लावली आहे. तसेच दुकान आहे. या सर्वांची भरपाई मिळावी. मला फक्त एकाची भरपाई मिळाली असून उरलेले बाकी प्रॉपर्टीची पण रक्कम मिळावी, अशी मागणी माजी नगरध्यक्ष गोकुळ कारडा यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे.

Protected Content