रेल्वे प्रवासात रात्री चुकूनही करू नका हे काम. . .नाही तर ?

नवी दिल्ली- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय रेल्वेने रात्रीच्या प्रवासासाठी नवीन नियमावली जाहीर केली असून प्रवाशांनी ती समजून घेण्याची आवश्यकता आहे.

भारतीय रेल्वेकडून तयार करण्यात आलेलं नियम रात्री प्रवास करणार्‍यांसाठी लागू करण्यात आले आहेत. प्रवाशांना रात्री कोणतीही अडचण येऊ नये, त्यांची झोपमोड होऊ नये या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या नियमांची तत्काळ अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. नव्या नियमांनुसार प्रवासी रात्री मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलू शकत नाही आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकू शकत नाही. प्रवाशांनी तक्रार केल्यास रेल्वे अशा व्यक्तींविरोधात कारवाई करेल. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

या नियमांमध्ये आता कोणताही प्रवासी रात्री मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलू शकत नाही, गाणी ऐकू शकणार नाही. तसेच रात्री नाईट लाईट सोडून सगळे दिवे बंद करावे लागणार. यासोबत ग्रुपमध्ये प्रवास करणारे प्रवासी रात्री उशिरापर्यंत गप्पा मारू शकणार नाहीत. सहप्रवाशांनी तक्रार केल्यास कारवाई होणार असल्याचे नवीन नियमात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच चेकिंग स्टाफ, आरपीएफ, इलेक्ट्रिशियन, केटरिंग स्टाफसोबत शांतपणे बोलण्याचे देखील बजावण्यात आले आहे. नवीन नियम हा दररोज रात्री दहापासून लागू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

या नियमाच्या अंतर्गत प्रवाशांकडून तक्रार प्राप्त झाल्यास रेल्वेच्या कर्मचार्‍यांना तिथे जाऊन समस्या सोडवावी लागेल. तक्रारीचं निराकरण न झाल्यास त्यासाठी कर्मचारी उत्तरदायी असेल. रेल्वे मंत्रालयानं सगळ्यांना विभागांना याबद्दलचे आदेश दिले असून तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचनादेखील दिल्या गेल्या आहेत.

 

 

Protected Content